बेळगावात मराठी तरुणांच्या सायकल रॅलीवर पोलिसांचा लाठीमार

0

बेळगाव : कर्नाटकातील बेळगावमध्ये मराठी तरुणांनी काढलेल्या सायकल रॅलीवर कर्नाटक पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याचे वृत्त आहे. या घटनेचा महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. बेळगावमधील तरुणांनी हा काळा दिवस असल्याचे संबोधले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, बेळगावमध्ये वारंवार मराठी भाषिकांची गळचेपी केली जात आहे. भाषा, संस्कृती आणि मराठी कार्यक्रमांवरुन येथे नेहमीच पोलीस प्रशासनाची दडपशाही सुरु असते. त्याचेच ताजे उदाहरण आज मराठी तरुणांनी काढलेल्या रॅलीदरम्यान पहावयास मिळाले आहे. केवळ मराठी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन सायकल रॅली काढल्याने कर्नाटक पोलिसांनी त्यांच्यावर अमानुषपणे लाठीमार केला. यामध्ये अनेक तरुण जखमी झाले आहेत. या प्रकाराचा विविध राजकीय पक्षांनी निषेध नोंदवला आहे.