जळगाव – शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलावर बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करणार्या दोघांवर बुधवारी शहर पोलिसांनी कारवाई केली. दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलावर दररोज काही रिक्षाचालक अवैधरित्या रिक्षा उभ्या करून थांबलेले असतात. स्टॉप नसतानाही रिक्षा पार्क करीत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. बुधवारी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गणेश मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरून रिक्षा क्रमांक एमएच.19.जे.6445 वरील चालक मो.अक्रम इसा शेख वय-25 व रिक्षा क्रमांक एमएच.19.व्ही.5873 वरील चालक वाहिद सैय्यद जफर अली वय-22 यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तपास सहाय्यक फौजदार सादीक शेख करीत आहे.