जळगाव । जिल्ह्यात अवैध वाळू उफसा करणार्या माफियाच्या विरोधात जिल्ह्यात धाडसत्र राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसापासून वाळू उफशाचे कनेक्शन राजकीय क्षेत्रातील नेत्याशी असल्याचे अनेक घटना मधून उघडकीस आले आहे. अवैधरित्या वाहतूक करणारे वाळू माफिया नेहमी जिल्ह्यातील नेत्याच्या ताफ्यात दिसून येत असल्याने चर्चेत राहतात. यामुळे आता थेट राज्यपाल के विद्यासागर यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध बेसुमार वाळू उपशा संदर्भात लक्ष घातले आहे. यामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या वाळूवाफियांचे धाबे दणाणणार आहे.
राजकीय कनेक्शन डोकेदुखी
रेती व्यवसायात बक्कळ पैसा कमवून अनेक धड झाले असताना राजकीय आशीर्वाद असणार्याचा अधिक सहभाग या व्यवसायात आहे. यामुळे स्थानिक पातळीवर अधिकार्याना देखील कार्यवाही करताना अडथळा निर्माण होत असतो. आता मात्र मुख्यमंत्री नव्हेत तर थेट राज्यपालांनी चौकशी करून कार्यवाहीचे आदेश केले असल्याने कार्यवाही अधिकार्याना कराव्या लागणार आहे. या संदर्भाचे आदेश जिल्हाधिकारी लवकरच पारित करणार आहे.
काय आहे प्रकरण ?
पाचोरा तालुक्यातील सुरु असलेल्या अवैध वाळू उपसा, गौण खनिज चोरी बाबत आलेल्या तक्रारी नुसार राज्यपालांनी जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहे. याची दाखल घेऊन जिल्हाधिकार्यानी सबंधित तहसील क्षेत्राकडून अहवाल मागविला आहे. पाचोरा येथील जिल्हा युवक कॉग्रेसचे सरचिटणीस अंबादास गोसावी यांनी पुराव्यानिशी राज्यपाल के विद्यासागर राव यांच्याकडे तक्रार केल्यानुसार. त्याची दखल राज्यपाल कार्यालयाने घेऊन तत्काळ कारवाई करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे आत जिल्हाभरात देखील वाळूचा अवैधरित्या वाहतूक करणारे माफिया जिल्हा प्रशासनाच्या रडारवर असणार आहे.