बेस्टच्या एकही संपकऱ्यांची नोकरी जाणार नाही-उद्धव ठाकरे

0

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे. या संपात सहभागी झालेल्या एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही, असे आश्वासन शिवसेना प्रमुख उद्धव यांनी दिले. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्र करण्यासह वेतन कराराचादेखील प्रश्न आहे. या सर्व मागण्यांबद्दल चर्चा सुरू आहे. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांनी अवाजवी मागण्या करू नयेत. आधीच बेस्ट प्रशासनाची तिजोरी रिकामी आहे. अवास्तव मागण्या केल्यास एक वेळ अशीही वेळ येईल की बेस्ट कर्मचाऱ्यांना पगारही देता येणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. संपावर गेलेल्या एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.