बेस्ट कर्मचाऱ्यांचा उपोषण; शशांक राव यांची प्रकृती बिघडली !

0

मुंबई: बेस्टच्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेले कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती बिघडली त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बेस्ट कामगारांचा आज गुरुवारी उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेस्ट प्रशासनाशी वाटाघाटी करूनही तोडगा न निघाल्याने कामगारांनी बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बेस्ट कामगारांनी वडाळा बस डेपोमध्ये उपोषण सुरू केलं आहे. स्वत: शशांक रावही या उपोषणात सहभागी झाले असून उपोषण सुरू असताना आज त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना केईएम रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २० मध्ये भरती करण्यात आले आहे.