मुंबई : बेस्ट कर्मचा-यांची यंदाची दिवाळी गोड होणार असून बेस्ट कर्मचा-यांना ५ हजार ५०० रूपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे. शुक्रवारी पार पडलेल्या बेस्ट महाव्यवस्थापकांच्या समितीत हे जाहिर करण्यात आले. याचा लाभ ४० हजार बेस्ट कर्मचा-यांना होणार आहे.
दिवाळी जवळ आल्याने बेस्ट कर्मचा-यांचे दिवाळी बोनसकडे लक्ष लागून होते. बोनसची रक्कम वेतनातून कापून घेऊ नये, अशी मुख्य मागणी कर्मचा-यांनी केली होती. बेस्टची आर्थिक स्थिती पाहता बोनस मिळेल की नाही? याबाबत कर्मचा-यांना साशंकता होती. अखेर शुक्रवारी बेस्टकडून बोनसची घोषणा करण्यात आली. बोनस वेतनातून कापण्यात येणार नसल्याने कर्मचा-यांची दिवाळी ख-या अर्थाने गोड होणार आहे.