घाटकोपर (निलेश मोरे) : बेस्ट कर्मचाऱ्यानी ऐन सणासुदीत पुकारलेल्या संपाचा मुंबईकराना नाहक त्रास सहन करावा लागला . वेतन वाढ तसेच बेस्ट परिवहन पालिकेने आपल्या ताब्यात घ्यावे या प्रमुख मागणीसाठी आज बेस्ट कर्मचाऱ्यानी संप पुकारला.
बेस्टच्या संपाचा मात्र काही खाजगी ट्रॅव्हल्सनी फायदा उचलल्याचे दिसून आले . घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर खाजगी ट्रॅव्हल्सनी रांगा लावल्या होत्या . बेस्ट घाटकोपर ते अंधेरी हे भाडे 12 रुपये दर आकारते तर जागृती नगर , असल्फा , अंधेरी कडे जाण्यासाठी हे खाजगी ट्रेव्हेल्स शेअर भाडे प्रवाशांकडून 20 रुपये दराने आकारत होते.