बेस्ट संप: संप मिटवा अन्यथा सोमवारी तमाशा बघा; मनसेचा इशारा

0

मुंबई-बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ७ जानेवारीपासून संप पुकारलेला आहे. आज संपाचा सातवा दिवस आहे. मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही. दरम्यान मनसेने सरकावर जबरी टीका केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी वडाळा डेपो बेस्ट कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि संपावर तोडगा काढण्याचा सरकारला इशारा दिला. अन्यथा सोमवारी तमाशा पाहायला तयार राहा असे ठणकावले आहे.

आज रविवारी, संदीप देशपांडे यांनी फेसबुक पोस्ट टाकत सरकारला संप मिटवा अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा असे सांगितले आहे. आजचा बेस्ट संपाचा सातवा दिवस अजूनही सरकार कडून हालचाल नाही सरकारच नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही उद्या पासून नाक दाबायला सुरवात करणार सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती त्यांनी तयार राहावं आणि सरकारनी परिणाम भोगायला तयार राहावं असे संदीप देशपांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे सरकारला इशारा दिला आहे.