बेहिशोबी मालमत्तेबाबत चौकशीची मागणी

0

जळगाव। जळगाव मनपाच्या नगररचना विभागात कार्यरत असतांना नियमबाह्य काम केल्याच्या तक्रारी संबंधातील फाईल मराठे यांनी गहाळ केलेली आहे. याबाबत मराठे यांचेवर गुन्हा दाखल करण्याची नोटीस आयुक्त मनपा यांनी निर्गमित केलेली आहे. लाचलुचपत घेवून अतिरीक्त संपत्ती कमावल्याप्रकरणी त्यांना नगररचना विभागातून बांधकाम विभागात नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर कारवाई होण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी अधिक्षक, ईडी व आयकर विभागाकडे तक्रारी अर्ज दिला आहे. मराठे यांचे विद्यमान वेतन 29,000/- मासिक असे असून उत्पन्नाचे इतर साधन नाही तरीही या वेतनातून प्लॉट, बंगला बनविणे इतकी रक्कम शिल्लक असणे शक्य नाही ही संपत्ती लाललुचपत मार्गाच्या माध्यमातून प्राप्त केलेली आहे. तसे उपलब्ध कागदपत्रांवरुन निदर्शनास येत आहे असे नाटेकर यांचे म्हणणे आहे.