बैजनाथधाम जाण्यासाठी भाविक रवाना

0

भुसावळ। श्रावण महिन्यात झारखंड येथील बैजनाथ धाम कावड यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. 105 किमी अंतरावर असलेल्या सुल्तानगंज येथून गंगाजल आणून महादेवाचा अभिषेक केला जातो. यासाठी भुसावळ येथून बाबा बैजनाथ धाम येथे यात्रेला जाण्यासाठी भाविक रेल्वेने रवाना झाले आहेत. याप्रसंगी रेल्वे स्थानकावर नातेवाईकांतर्फे भाविकांना निरोप देण्यात आला.

कावड यात्रेत यांचा आहे सहभाग
या यात्रेतमध्ये बबलू चितोडीया, मनोज चितोडीया, दामोदर राजपूत, नकुल राजपूत, धीरज राणे, धीरज वारके, शुभम वारके, मयूर कोळी हे सुलतानगँज, बिहार येथून गंगाजल पाठीवर कावडमध्ये घेऊन पुढील 120 किमीचा प्रवास पायी करुन बाबा बैजनाथ धाम झारखंड येथे पुढील प्रवासासाठी रवाना होतील.