जळगाव : महापालिकेच्या आयुक्तपदी चंद्रकांत डांगे यांची नियुक्ती 2 मे रोजी जाहीर होवूनही त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. 26 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर त्यांनी काल 28 मे रोजी पदभार स्वीकरला आहे. पदाभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. शहरात काही बदल घडविण्यापूर्वी त्यांनी आपल्या दालनापासून बदलास सुरूवात केली आहे. आज आयुक्त डांगे यांनी त्यांच्या दालनातील बैठक व्यवस्था बदलली आहे. पुर्वी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस व त्यांच्या नंतर जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्याकडे प्रभारी आयुक्तपदी होत्या. यानंतर किशोर बोर्डे हे आयुक्तपदी रूजू झाले होते. परंतु, त्यांच्या दालनातही बदल झाला नव्हता. मात्र, जीवन सोनवणे यांनी पदभार स्वीकारताच कर्मचार्यांमध्ये सकारात्मक भावना जागृत व्हावी यासाठी मोटीव्हेशनल कोट लिहलेले फलक लावले होते.
उद्योग समूहाच्या गाडीने कार्यालयात आगमन
त्यांच्या निवृत्तीनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रभारी आयुक्तांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी जीवन सोनवणे यांनी दालनात केलेले बदल कायम ठेवून आपला कार्यभार पुर्ण केला. परंतु, पालिकेचे नवनियुक्त आयुक्त डांगे यांनी सोमवार 28 मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच दुसर्या दिवशी दुपारपर्यंत कामकाज केल्यानंतर आपली आसन व्यवस्था बदलवून घेतली आहे. त्यांची आसन व्यवस्था बदलली तशीच महापालिकेच्या भेडसावणार्या प्रश्नांवर ते तोडगा काढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आयुक्त डांगे यांनी शासकीय गाडी न घेता जैन इरिगेशनच्या गाडीने कार्यालयात येणे पसंत केले आहे.