धरणगाव : तालुक्यातील साकरे ते कंडारी बु.॥ येथे बैलगाडीला मागून दुचाकीने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी धरणगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
बैलगाडीवर दुचाकी आदळली
उत्तम तुकाराम भिल (50, कंडारी बु.॥, ता.धरणगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उत्तम भिल यांचा मुलगा विजय उत्तम भिल व त्याचा मित्र सोमनाथ रोहीदास भिल हे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए.जी. 4197) ने कंडारी बु.॥ येथे घरी येत असताना रस्त्यावरून राजेंद्र पाटील हे बैलगाडीने जात असताना विजय भील याच्या ताब्यातील दुचाकी बैलगाडीवर आदळली. या अपघातात ुचाकीवरून पडल्याने विजयच्या डोक्याला, तोंडाला, छातीला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला तर सोमनाथ रोहिदास भिल हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात मयत विजय उत्तम भिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार खुशाल पाटील हे करीत आहेत.