चाळीसगाव। येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बैलजोडी विकत घेऊन ती दुसर्यास विक्री करून उर्वरित रक्कम शेतकर्याला न देता त्याची फसवणूक केल्या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला शेतकर्याने बुधवार 26 जुलै 2017 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहिती नुसार करगाव तांडा न 2 ता चाळीसगाव येथील शेतकरी अरुण गोविंद चव्हाण (42) यांच्या मालकीची खिल्लारी जातीची काळ्या भुरकट रंगाची बैलजोडी दि 3 जून 2017 सकाळी 9 वाजता चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आरोपी भगवान भिकन सोनावणे रा पिंप्री कोळगाव ता भडगाव याना 55 हजार रुपयात विक्री केली. या रकमेपैकी आरोपीने त्यांना 19 हजार रुपये दिले व उर्वरित 36 हजार रुपये नंतर देतो, असे सांगून बैल जोडी परसपर विक्री करून उर्वरित 36 हजार रुपये त्यांना न देता त्यांची फसवणूक करून विश्वास घात केल्याप्रकरणी अरुण चव्हाण बुधवार 26 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आरोपी भगवान भिकन सोनावणे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिलिंद शिंदे करीत आहे.