चाळीसगाव। तालुक्यातील ओढरे येथील त्या दोन तरुणांसह बैलाचा मृत्यू हा शेताच्या बांधावर असलेल्या विजेच्या धक्याने झाला असुन त्या शेतकर्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन चौकशीसाठी त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत ओढरे चाळीसगाव येथील सोनाली योगेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बळीराम पिता जाधव यांनी जवळच असलेल्या विजेच्या खांबावरुन बेकायदेशीर आकडा टाकुन ईलेक्ट्रीक वायरने त्यांच्या शेतातील बांधावरुन विज प्रवाह घेतला होता त्यातील वायर या मोकळ्या असल्याने योगेश राठोड, दत्तु राठोड या दोघांसह बैल मयत पावले. जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर ईलेक्ट्रीक वायर शेतात लावली त्या वायरचा शॉक लागुन दोघे तरूण व बैलाचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शेत मालकास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बोरसे करीत आहेत.