बॉक्सिंगमध्ये भाग्यश्री पटेलला ब्रॉन्झ पदक

0

बावधन । येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या भाग्यश्री पटेल (इ.12 वी) या विद्यार्थीनीने शालेय विभागस्तर स्पर्धेमध्ये 19 वर्षांखालील मुलींच्या गटात बॉक्सिंगमध्ये प्रथम तर शालेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली.

भवानी पेठतील अरुणकुमार वैद्य स्टेडियममधील क्रांतीवीर लहुजी वस्ताद बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रात झालेल्या शालेय विभागस्तर बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 19 वर्षांखालील मुलींच्या गटात 65 ते 67 किलो ग्रॅम वजन गटात भाग्यश्रीने प्रथम क्रमांक पटकविला. अकोला येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तिने ब्रॉझ मेडल पटकाविले. तसेच तिसर्‍या आमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये भाग्यश्रीने 65 किलोग्रॅम गटात कांस्यपदक पटकाविले. संस्थापक डॉ. संजय चोरडिया, संकेत नालकर व निशिगंधा पाटील यांचे तिला मार्गदर्शन लाभले.