बॉक्सिंग स्पर्धेत रुद्र, अंशुल, रोहित विजेते

0

पुणे । रुद्र बुंदेले, अंशुल चव्हाण, रोहित पवार यांनी आपापल्या वजनी गटात शानदार कामगिरी करताना जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पुणे मनपा शिक्षण विभाग आयोजित आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेतील 14 वर्षांखालील गटात विजेतेपद साकारले. या स्पर्धेचे आयोजन अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे करण्यात आले होते. 28-30 किलो या वजनी गटाच्या अंतिम फेरीत मुक्तांगणच्या सुकीयान शेखने मुक्तांगणच्याच अथर्व बिडकरला 3-0 असे पराभूत केले, तर 30-32 किलो वजनी गटात क्रेसेंट स्कूलच्या उमर शेखने अभिनव स्कूलच्या राज खंडाळकरला 3-0 पराभूत करताना विजेतेपद साकारले. महाराष्ट्र मंडळच्या मल्हार कुलकर्णीने रोझरीच्या शुभ सार्थेला 3-0 असे पराभूत करताना 32-34 किलो वजनी गटाचे विजेतेपद पटकावले. रोहित पवार, सिद्धार्थ दिंडाळे, पृथ्वीराज बगल, पार्थ केंदुळे, अंशुल चव्हाण, सलीम सय्यद, चैतन्य पेडणेकर व रुद्र बुंदेले यांनी आपापल्या वजनी गटात विजेतेपद पटकावून स्पर्धेवर वर्चस्व गाजविले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल
28 ते 30 किलो गट – सुकीयान शेख (मुक्तांगण-3) वि वि अथर्व बिडकर (मुक्तांगण-0), तिसरा क्रमांक – वरुण पोवेन (एम ए शिंदे हायस्कूल), तनिष्क होले (रोझरी), 30 ते 32 किलो गट – उमर शेख (क्रीसेंट स्कूल- 3) वि वि राज खंडाळकर (अभिनव- 0), तिसरा क्रमांक – भारत जानू (एम ए शिंदे हायस्कूल), वेदांत बेंगळे (ऑर्नेस स्कूल).

32 ते 34 किलो गट – मल्हार कुलकर्णी (महाराष्ट्र मंडळ- 3) वि वि शुभ सार्थे (रोझरी- 0), तिसरा क्रमांक – अथर्व मोहिते (बिशप्स), ध्रुव नागूल (वायएमसीए) 34 ते 36 किलो गट – रोहित पवार (सेनापती हैबत- 2) वि वि अरिहंत मोरे (अभिनव- 1), तिसरा क्रमांक – मितेश शिंदे (एसएसपीएमएस बोर्डिंग), गरावीरसिंग धिल्लन (बिशप्स स्कूल, कल्याणी नगर) 36 ते 38 किलो गट – सिद्धार्थ दिंडाळे (एमईएस बॉईज स्कूल- 2) वि वि हर्ष हनमघर (विखे पाटील स्कूल- 1 ) तिसरे क्रमांक – महाविया शेख (वायएमसी), आलीय कांबळे (सेंट जोसेफ).

38 ते 40 किलो गट – पृथ्वीराज बगल (एस. व्ही. गरवारे- 2) वि वि निरंजन खावळे (मनपा 25- 1) तिसरा क्रमांक – आर्यन ठाकूर, जयंत चंद्रमौर्य (सेंट व्हिसेंट). 40 ते 42 किलो गट – पार्थ केंदुळे (बीएसएम- 3) वि वि रिषभ परदेशी तिसरा क्रमांक – अगत्य यादव (बिशप्स), सनी कापसे (एमईएस). 42 ते 44 किलो गट – अंशुल चव्हाण (एसएसपीएमएस स्कूल- 2) वि वि हर्ष पैलवान (ऑर्नेस स्कूल- 1). तिसरा क्रमांक – ध्रुव लाव (बिशप्स, कल्याणीनगर), आयुष अवघडे (सरदार दस्तूर).