जळगाव प्रतिनिधी । मबॉक्स ऑफ हेल्प ग्रुपतर्फे शहरातल्या विविध शाळांमधील विद्यार्थिनींची जनजागृती रॅली काढली. या रॅलीला उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला.
या कार्यक्रमाला श्रीराम पाटील, अॅड. प्रवीण झंवर, डॉ. अपर्णा मकासरे, डॉ. माधुरी कासट, बॉक्स ऑफ हेल्प ग्रुपच्या प्रकल्प प्रमुख सुधा काबरा, तरुणा काबरा, किरण भामरे, नीळकंठ वाणी, विजय लाठी, पुरुषोत्तम काबरा, मीनल लाठी, स्वाती अग्रवाल, सपना तिवारी आदी होते. जनजागृती रॅलीत शकुंतला विद्यालय, मुंदडा हायस्कूल, सरस्वती विद्या मंदिर, ज्ञान साधना विद्यालय, कन्या शाळा, खुबचंद विद्यालय, सिंधी हायस्कूल, विद्या निकेतन आदी विद्यालयातील विद्यार्थीनींनी सहभाग होता. प्रकल्प प्रमुख काबरा यांनी उपक्रमाची प्रास्ताविकात माहिती दिली. डॉ. कासट यांनी सूत्रसंचालन केले.