पोलीस उपअधीक्षकांसह पथकाची कारवाई; 19 जणांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव: शहरातील नवीपेठमधील जिल्हा परिषद चौकाजवळील बॉम्बे हॉटेलच्या तळमजल्यावर सुरु असलेल्या जुगाराच्या अड्डयावर सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने छापा टाकला. या कारवाईत पथकाने 19 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून रोकडसह जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 10 हजार 946 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यांच्या पथकाची कारवाई
पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना नवीपेठेतील जिल्हा परिषद चौकाजवळील जूनी बॉम्बे लॉजिंगच्या तळमजल्यावरील एका बंद खोलीत जुगाराचा अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक नितीन गणपुरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र बागुल, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास महाजन, उमेश भांडारकर, सचिन वाघ, रविंद्र मोतीराणा, सहाय्यक फौजदार विनयकुमार देसले, अशोक फुसे याच्या पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. तयानुसार पथकाने घटनास्थळ गाठून चहूबाजूंनी सापळा रचून छापा टाकला.
19 जणांना घेतले ताब्यात
या कारवाईत पोलिसांनी विकास रमेश सोनवणे वय 45 रा. शनीपेठ, फिरोज गुलाब पटेल वय 38 रा. सदाशिव नगर, हेमंत रमेश शेटे वय 28 कांचननगर, अनिल रामभाऊ छडीकर वय 51 रा. शिवाजीनगर, अशोक ओंकार चव्हाण वय 62 रा कानळदा रोड के.सीपार्क, घनशाम लक्ष्मणदास कुकरेजा वय 61 रा. सिंधी कॉलनी, अनिल भिमराव ढेरे वय 52 रा लक्ष्मीनगर, पंढरी ओंकार चव्हाण वय 50रा. त्रिभुवन कॉलनी, रायचंद लालचंद जैन वय 61 रा. गणपती नगर, रामदास दगडू मोरे वय 59 रा. शाहूनगर, नितीन परशुराम सुर्यवंशी वय 40 रा. हरिओम नगर, नजीर शफी पिंजारी वय 50 रा. रा. कोळीपेठ, पंकज वामन हळदे वय 19 रा.चौघुले प्लॉट, आसीफ अहमद खाटीक वय 46 रा. पिंप्राळा हुडको, ब्रिजलाल आनंदराम वालेचा वय 68 रा. लक्ष्मीनगर, मोहम्मद सलिम मोहम्मद ईस्माईल वय 65 रा. इस्लामपुरा, भवानीपेठ, सलिम खान मुसा खान वय 53 रा.शिवाजीनगर, नूरा गुलाम पटेल वय 35 रा. सुरेशदादा जैन नगर व पवन गुरुदासराम लुल्ला वय 42 रा.सिंधी कॉलनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच टीव्हीचा सेटअप बॉक्स, मोबाईल, दुचाकी, रोकड व जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 10 हजार 946 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरुन सर्व 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक
पोलीस निरिक्षक रविंद्र बागुल हे करीत आहेत.