बॉलिवूडचा परफेक्शनिस्टची राजकारणात येण्याची इच्छा नाही

0

मुंबई: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अमीर खान अभिनयासह सामाजिक कार्यातही अग्रेसर असल्याचे पाहायला मिळते. अनेक राजकीय नेत्यांशी चांगले संभंध असूनही ‘मी राजकारणात कधीही जाणार नाही’ असे स्पष्टपाने सांगितले पुण्यात आयोजित केले गेलेल्या एका पत्रकार परिषदेत.

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आमिर खान महाराष्ट्रामध्ये गावोगावी फिरत असतो. सामाजिक कार्य करण्याकरता राजकारणात उतरणेच गरजेचे नाही, तर बाहेर राहूनही आपल्याला समाजासाठी काहीतरी करता येते, असेही त्याने यावेळी सांगितले.पाणी फाऊंडेशन टीम पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमुळे एक वर्षांसाठी ब्रेक घेण्याच्या तयारीत होती. मात्र, आम्ही तसे करणार नाही. तर,अधिक चांगले काम करण्याचा आमचा हेतू आहे. या कामाला तीन वर्ष पूर्ण झाले आहे. या कामाबाबत समाधानी असल्याची भावना आमिरने यावेळी व्यक्त केली.