बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचे निधन

0

मुंबई: बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आले होते. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचे सांत्वन केले.

दोन दिवसांपूर्वी त्याची आई सईदा बेगम यांचे निधन झाले. लॉकडाउनमुळे इरफान आईला शेवटचे पाहायलाही जाऊ शकला नाही. गेल्या काही वर्षांपासून इरफान आजारी आहे. २०१७ मध्ये कर्करोगावर उपचार करण्यासाठी तो परदेशात गेला होता.

बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक चित्रपट केले आहेत. हिंदी मीडियम हा त्यांचा गाजलेला चित्रपट. शैक्षणिक धोरणावर भाष्य करणाऱ्या त्यांच्या या चित्रपटाने अधिक पसंती मिळविली.त्यांच्या निधनाने बॉलिवूड जगतात हळहळ व्यक्त होत आहे.