बॉलिवूड मि. अ‍ॅण्ड मिस इंडियाच्या स्पर्धेत 31 जणांची निवड

0

जळगाव। येथील आय.एन.आय.एफ.डी. या संस्थेच्या सहकार्याने दिल्ली येथील स्टुडिओ 19 फिल्म्स यांच्यामार्फत बॉलिवूड मी. अँड मिस 2017 या स्पर्धेसाठी निवड व चाचणी घेण्यात आली. या स्पर्धेत 80 मुला-मुलींना सहभाग नोंदविला होता. त्यात अंतिम फेरीसाठी खान्देशातील 21 मुले व 10 मुली असे 31 जणांची निवड करण्यात आली. स्पर्धेत निवड झालेल्यांना बॉलिवूड तिकीट देण्यात आले. स्पर्धेत निवड झालेल्या सर्व खान्देशातील 31 जणांचे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे.

अंतिम फेरी 24 जून रोजी नवी दिल्ली येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असून निवड झालेल्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अंतिम निवडमध्येही निवड व्हावी यासाठी सर्व मुले मेहनतही घेत आहेत. अंतिम फेरीच्या निवड चाचणीसाठी ज्यूरी म्हणून बॉलिवूड कलाकार अरबाज खान, सना खान, रजनीश दुग्गल, विशाल पांडे, यश अलवंत असणार आहेत. खान्देशातील तरूणांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आय.एन.आय.एफ.डी. या संस्थेच्या संचालिका संगीता पाटील पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयेजन केले होते. विशेष म्हणजे जळगावात असा इव्हेंट प्रथमच घेण्यात आला. या स्पर्धेत फॅशन डिझाईन, अभिनय आणि मॉडेलिंग यासाठी चाचणी घेण्यात आली. ज्युरी म्हणुन चित्रपट दिग्दर्शक विशाल दुग्गल, फॅशन डिझाइनर राशी वर्मा, संगीता पाटील यांनी काम पाहीले.