मुंबई : बॉलीवूडचा हिरो नंबर-1 म्हणजेच गोविंदाचा आज ५५वा बर्थडे आहे. गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रे केली आहेत, मात्र त्यापैकी त्यांचे विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले. गोविंदा आज जरी चित्रपटापासून दूर असले तरी त्यांचे चाहते आणखीही तेवढेच आहेत.
गोविंदा हे वैयक्तिक जीवनात मातृभक्त म्हणून ओळखले जातात. त्यांना आपल्या आईबद्दल विशेष प्रेम होते. गोविंदा हे साधू संतांचाही सन्मान करतात. ९०च्या दशकात गोविंदाने डान्सची रेखाच बदलली होती. गोविंदाने डाँसिन्गला एक नवीन ओळख दिली होती. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक बॉलीवूड कलाकरांनी त्यांना शुभेच्छा दिले आहेत आणि रणवीरनेही खास पोस्ट शेअर केली आहे.