मुंबई: एकामागे एक बॉलीवूडचे स्टारकिड्स बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहेत. अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण झालं. ‘धडक’ या चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली. आता श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी सुद्धा अभिनयात करिअर करणार असल्याची चर्चा
सुरु आहे . विशेष म्हणजे खुशीच्या लाँचची जबाबदारी निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने घेतल्याची माहिती आहे.
तर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही बॉलीवूड मध्ये एन्ट्री करायला तयार आहे. विशेष म्हणजे आर्यन खानसोबत खुशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं कळतंय. आर्यनसुद्धा त्याच्या पदार्पणासाठी जोरदार तयारी करत आहे.खुशी आणि आर्यन ही नवीन जोडी स्क्रिनवर पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. सोशल मीडियावर खुशीच्या चाहत्यांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असल्याचं लक्षात येत आहे.