मुंबई : हरियाणवी बिन्दास्त डान्सर सपना चौधरी नेहमीच तिच्या नृत्यातील अदांनी चाहत्यांवर भूरळ पाडते. सोशल मीडियावर तिच्या डान्सचा एक व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती बॉलीवूडच्या फेमस गाण्यांवर थिरकताना दिसत आहे.
सपनाच्या या व्हिडिओला आत्तापर्यंत ५ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. यावरुनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. तिचे ‘तेरी आख्या का यो काजल’ हे गाणे तुफान हिट झाले आहे.
सपना सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.