बॉलीवूड चित्रपटावर कोरोनाचा वाईट परिणाम

0

मुंबई: देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सरकारकडून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे सांगितले होती. तसेच राज्यसरकारने दक्षतेचा उपाय म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई येथील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव आज पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सिनेमांवरही कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे.

शुक्रवारी दोन मराठी सिनेमा प्रदर्शित झाले सुबोध भावेचा मुख्य भूमिका असलेला ‘विजेता’ आणि बिग बी अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांचा मुख्य भूमिका असलेला ‘एबी आणि सीडी’. तर हिंदी रूपेरी पडद्यावर इरफान खान आणि राधिका मदान यांच्या भूमिका असलेला ‘अंग्रेजी मीडियम’ सिनेमा प्रदर्शित झाला. कोरोनाची दहशत यंदा फ्रायडे रिलीजवर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे रसिकही सिनेमागृहांकडे वळले नसल्याचे चित्र जागोजागी पाहायला मिळाले. थिएटरही आता बंद करण्यात आल्यामुळे चित्रपट व्यवसायावरही याचा चांगलाच फटका बसल्याचे चित्र आहे.