बोदवड- बोंड अळी नुकसानीची रक्कम तहसील स्तरावर प्राप्त झाल्यानंतही ती शेतकर्यांना वाटप करण्यात न आल्याने तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख नाना पाटील यांनी दिला आहे. बोदवड भेटीवर आलेल्या जिल्हाधिकार्यांनी शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते मात्र 15 दिवस उलटूनही शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. बोदवड तालुक्यासाठी तीन कोटी 42 लाख 79 हजार रक्कम प्राप्त झाली आहे. शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास दिरंगाई करणार्या दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे. आठ दिवसात बोदवड तालुक्यातील 52 गावातील शेतकर्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा न झाल्यास शेतकरी संघटना तहसील कार्यालयावर मोर्चा आणेल, असा इशारा देण्यात आला आहे.