बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान; भरपाईची मागणी

0

चाळीसगाव । शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य तथा अचलपुरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना निवेदनाद्वारे कपाशीवरील बोंडअळी मूळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून आजपावेतो मदत जाहीर झाली नाही तसेच जाचक नियम लावुन आणि वेळकाढुपणा मुळे व कागदपत्रांची पूर्ततेचे त्यांच्याकडे मागणी केली जात आहे.

या संदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे आपण मागणी लावुन धरावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी बच्चू कडू यांनी आपण या संदर्भात नक्की प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी किसान सोशल फाउंडेशनचे श्रीकांत राजपूत, किरण पाटील, राहुल वाकलकार, योगेश पाटील उपस्थित होते.