सातारा – बोअरवेलमध्ये अडकलेल्या मंगेशला वाचवण्यात आपत्कालीन पथकाला अपयश आल्याने अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. चिमुकल्या मंगेशला सुखरूप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन पथकाने 11 तास शर्थींचे प्रयत्न केले. माण तालुक्यातील विरळी येथील मंगेश जाधव हा चिमुकला सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास खेळताना बोअरवेलमध्ये पडला होता. सुरुवातीला ग्रामस्थांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर आलेल्या राष्ट्रीय आपत्कालीन पथकाने बोअरवेलमध्ये जीव गुदमरू नये, यासाठी ऑक्सिजन पंप सोडून मंगेशच्या जीविताची काळजी घेतली व 11 तासांनंतर बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.