यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा 35 हजार रूपये किंमतीचे दोन बोकड चोरी गेल्या प्रकरणी ग्रामस्थांच्या सतर्कतेनंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची म्हणजे 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ईरफान इब्राहिम तडवी यांच्या घराबाहेरील बोकड चोरताना ग्रामस्थांनी महेंद्र भिलाला (मालपूरा, ता.झिरण्या, जि.खरगोन) व अशोक माधव भिलाला (मांडवी, ता.झिरण्या, जि.खरगोन) यांना पकडत यावल पोलिसांच्या स्वाधीन केले होते. 29 जुन रोजी रात्री ही घटना घडली होती. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास हवालदार अजीज शेख करीत आहेत.