बोगस अपंग शिक्षकांचे धाबे दणाणले

0

चाळीसगावात गटशिक्षण अधिकार्‍यांनी केली कागदपत्रांची पडताळणी
चाळीसगाव । जळगाव जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा तिढा कायम आहे. याबाबत शिक्षकामध्ये त्रिव असंतोष आहे. विस्थापित झालेल्या शिक्षकांना अद्यापही न्याय मिळालेला नसल्याने संघटना देखील हतबल झाल्या आहेत. या शिक्षकांना न्यायाच्या प्रतीकक्षा दिसून येत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांनी अपंग शिक्षकांवर बनावट अपंग असल्याचा आरोप देखील केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत उघड उघड चर्चिली जाते अपंग बनावट प्रमाणपत्राचा अनेकांनी उपयोग केला आहे ही वस्तुस्थिती असून चांगले धडधाकड शिक्षक बदलीसाठी अपंग झाले असून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी बर्‍याच दिवसांपासून लटकून राहिली होती अखेर येथील नालंदा शाळेत दिवसभर अपंग शिक्षकांच्या कागदपत्रांची नुकतीच पडताळणी गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्तार अधिकारी एस.पी. विभांडीक, विलास भोई यांनी केली त्यात काय खरच किती शिक्षणाकडे बनावट प्रमाणपत्र आढळून आली ही माहिती गुलदस्त्यात असल्याने बनावट शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

चाळीसगाव शिक्षकांचा गुंता वाढला
सार्वत्रिक बदलीअंतर्गत यंदा जिल्ह्यात एकूण 347 शिक्षक विस्थापित झाले असून त्यात चाळीसगाव तालुक्यात एकूण 112 शिक्षकांचा समावेश होता. अमळनेर तालुक्यात देखील बरेच शिक्षक विस्थापित झाल्याची व त्यांचा प्रश्‍न मार्गी लागावा. यासाठी त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली ही वस्तुस्थिती आहे. यातील काही शिक्षक तडजोड म्हणून पदस्थापना देण्यात आलेल्या शाळेत रुजू झाले आहेत मात्र पती पत्नी एकत्रीकरण या योजनेतून देखील अद्याप या शिक्षकांना वंचित राहावे लागले. सुमारे 30 किमी. अंतराबाहेर पदस्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे आणि या बदल्यांचा तिढा कायम राहिला आहे. शिक्षण विभागाने केवळ वेळोवेळी मार्गदर्शन मागविले जात असल्याची सबब पुढे केली जात आहे.

(उर्वरित बातमी वाचा सोमवार 13 ऑगस्टचा दैनिक जनशक्तिचा अंक)