संमधीतांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार सुरेश घुले यांचा ईशारा
हडपसर : मांजरी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान ओळखपत्रे सापडली असून निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले आहे. मात्र असे असताना पोलिसांनी कारवाई टाळली असल्याचे निदर्शनास आले आहे.बोगस ओळखपत्र व त्यामागील सूत्रधारास अटक करावी अन्यथा पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांनी दिला आहे.
आमदारांच्या दबावामुळे कारवाई नाही
हडपसर पोलीस स्टेशनमध्ये सुरेश घुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील यांची भेट देऊन निवेदन दिले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार विशाल घुले, शिवाजी खलसे, प्रशांत घुले, दिलीप टकले आदी यावेळी उपस्थित होते.
नुकतीच मांजरी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली, या निवडणुकीत वार्ड क्र.3 मध्ये 300 बोगस मतदान ओळखपत्र व बाहेरून मतदान साठी आलेले कार्यकर्ते सापडले बोगस ओळखपत्र व कार्यकर्ते हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले. पण आमदार योगेश टिळेकरांच्या दबावामुळे पोलिसांकडून कारवाई अद्याप करण्यात आली नाही, बोगस मतदान ही लोकशाहीला मारक असून प्रामाणिक कार्य करणार्या कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. पोलिसांनी गांभीर्याने कारवाई केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने हडपसर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मांजरी निवडणूक पारदर्शक पद्धतीने झाली नाही, पोलीस, प्रशासन हाताशी धरून आमदारांनी अशाच पध्द्तीने पूर्ण ग्रामपंचायत वार्डात बोगस मतदान केल्याचा संशय सुरेश घुले यांनी व्यक्त केला आहे.बोगस निवडणूक ओळखपत्रे बाबत निवडणूक आयोग व संबंधित कार्यालयाकडे आम्ही रिपोर्ट पाठविणार आहोत असे मिलिंद पाटील यांनी सांगितले. विशाल ढोरे यांच्या तक्रारीचा तपास करून कारवाई करणार असल्याचे विष्णू पवार यांनी सांगितले.
कोंढव्या प्रमाणे मांजरीत आमदाराचा डाव
मनपा निवडणुकीत आमदार योगेश टिळेकर यांनी आईच्या प्रभागात बाहेरून लोक आणून बोगस मतदान केले होते, तेव्हा गाड्या पकडल्या होत्या. मांजरी ग्रामपंचायत निवडणुकीतही बाहेरून बोगस मतदार आणले, बोगस मतदार ओळखपत्र सापडले आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम आमदाराने केले आहे, जनता 2019 निवडणुकीत परतफेड करेल.
-सुरेश घुले
हल्ला करणार्या गुंडांवर गुन्हा दाखल करा
निवडणुकीच्या आदल्या दिवशी माझ्या घरावर व कुटुंबावर हत्यारे घेऊन हल्ला केला, गाड्या फोडल्या, दगडफेक केली. पोलिसांनी अद्याप या गुंडांवर कारवाई केली नाही, हल्ला करणारे हल्लेखोर प्रमोद कोद्रे, प्रदीप कोद्रे, सराईत गुन्हेगार संतोष जायभाय, बबन जगताप व मुख्य सूत्रधार यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करणार.
-विशाल ढोरे
मनसे – विभागप्रमुख हडपसर