बोगस तृतीयपंथीयाची यथेच्छ धुलाई

0

चंद्रपूर : चंद्रपुरात एका बोगस तृतीयपंथीयाची यथेच्छ धुलाई करण्यात आल्याची घटना घडली आहे. चंद्रपुरात एक बोगस तृतीयपंथी त्यांचा वेष परिधान करुन कमाई करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची माहिती मिळताच तेथील तृतीयपंथीयानी त्याची मनसोक्त धुलाई केली.

याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता तृतीयपंथीयांबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बोगस तृतीयपंथी वेष बदलून शहरातल्या भिवापूर परिसरात मातानगरमध्ये कमाई करताना आढळला. संताप अनावर झालेल्या तृतीयपंथीयांनी त्याला बॅटनेच धोपटायला सुरुवात केली होती. शहरात तृतीयपंथीयांची मोठी वस्ती आहे हे लक्षात येताच इथे काही बोगस तृतीयपंथीयांचा शिरकाव झाला आहे. दरम्यान, तृतीयपंथीयांसाठी काम करणार्‍या संबोधन ट्रस्ट संस्थेने अशा बोगस तृतीयपंथीयांवर कारवाईची मागणी केली आहे.