धुळे । साक्री तालुक्यातील भोंनगाव येथील रेशन दुकानदार दिनेश यशवंत बोरसे यांच्याकडे आज सकाळी लाचलुचपत विभागाचे अधिकारी म्हणून तीन अधिकारी आले व बोरसे यांना धमकावले बोरसे यांनी साक्री तहसील कार्यालयात पुरवठा विभागात याबाबत विचारपूस केली असता हे अधिकारी बोगस अधिकारी म्हणून सामान्य जनतेच्या लूट करीत असल्याचे उघडकीस आल्याने संतप्त रेशन दुकानदारांनी या तीन भामट्यांना चोप दिला यातील एक भामटा पसार झाला आहे. दोन भामट्याना साक्री पोलिसात नेण्यात आले. विशेष म्हणजे, यांच्याकडे बोलेरो गाडी देखील मिळून आली आहे. यांच्यासह इतर जण जिल्ह्याती भामट्यांची टोळी सक्रिय आहे की नाही यावकडे सर्वांचे लक्ष आहे. या संदर्भात अधिक तपास पोलिस अधिकारी करीत आहे.