पिंपरी : जगविख्यात पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त ‘अलाइव्ह संस्थे’तर्फे थेरगाव बोट क्लब येथे रविवारी (दि.12) पक्षीतज्ज्ञ उमेश वाघेला यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी साडेसात ते साडेदहा या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे.
येथे सर्वांसाठी मोफत प्रवेश असून सर्व वयोगटातील नागरिक या उपक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी समीर पाटील (9561062764), प्रशांत पिंपळनेरकर (9822552143) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.