चाळीसगाव । चाळीसगांव पोलीस स्टेशनचे पोउनि विजयकुमार बोत्रे यांना पंधरा वर्ष पोलिस सेवेत उत्तम सेवाभिलेख ठेवल्या बद्दल सन 2016 चे पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पदक घोषित करण्यात आले आहे. त्याबद्द्ल त्यांचे अप्पर पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद पाटील, शहर पोनि आदिनाथ बुधवंत, ग्रामीण पोनि सुनिल गायकवाडसह आदींनी अभिनंदन केले.