बोदवडकरांच्या आंदोलनानंतर गळती थांबवण्यासह पाईपलाईन शिप्टींगचे आश्‍वासन

0

बोदवड- ओडीएची पाईपलाईन फुटल्यानंतर शहरवासीयांना टंचाईचे चटके जाणवत असल्याने संतप्त बोदवडकरांनी गुरुवारी पाईपलाईन फुटलेल्या हिंगणाघाटी येथे धाव घेत आंदोलन केले होते. यानंतर ठेकेदार कंपनीच्या सल्लागार अभियंत्यांनी तातडीने गळती दुरुस्तीचे आणि पाईपलाईन शिफ्टिंग करण्यासह रस्त्याचे उर्वरित काम न करण्याबाबत आश्‍वासन दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.

आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
28 मे रोजी रात्री आठ वाजता हिंगणा घाटीवर ओडीएची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती शिवाय संजय वराडे यांनी सोशल मीडियातून याबाबत आवाज उचण्याचे आवाहन केल्यानंतर बोदवडकरांनी त्यास प्रतिसाद देत गुरुवारी सकाळी पाईपलाईन फुटलेल्या हिंगणा घाटी एकत्र येत घोषणाबाजी केली. संजय वराडे, उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण, गटनेता देवेंद्र खेवलकर, आनंदा पाटील, विजय पालवे, अनंता वाघ, शांताराम कोळी याप्रसगी उपस्थित होते. आंदोलनाची माहिती मिळताच नवी मुंबई येथील ध्रुव कन्स्ल्टन्सी सर्व्हीसेसचे सल्लागार अभियंता डी.एच.चौधरी यांनी धाव घेतली. दिवसभरात पाईपलाईन दुरुस्तीचे आश्वासन देण्यात आले शिवाय पाईप लाईन शिफ्टिंगचे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करणार नसल्याचे तोंडी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. प्रसंगी देवेंद्र खेवलकर, उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण, शांताराम कोळी, विजय पालवे, आनंदा पाटील, नाना माळी, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अनंता वाघ, रवी वाघ व सर्वपक्षीय कार्यकर्ते आदी उपस्थित होते.