बोदवडच्या इसमाचा अज्ञात कारणाने मृत्यू

0

भुसावळ- शहरातील स्मशानभूमीच्या पाठीमागील पाझर तलावाजवळील रहिवासी नथ्थू दशरथ पावरा (55, रा.बोदवड) यांचा 5 रोजी सकाळी 11.30 वाजेपूर्वी मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. हवालदार संजय भोसले यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकरणी बोदवड पोलिसात आनंदा रामदास पाटील (बोदवड) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय दिनकर झायडे करीत आहेत.