बोदवड- बोदवडमधील स्वामी विवेकानंद नगरमधील रहिवासी किशोर प्रकाश डिके (वय 27) या अविवाहित तरुणाने बुधवारी सायंकाळी 5.30 वाजता घरातील बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. राहत्या घराजवळ भंडारा असल्याने किशोरने सायंकाळी पाच वाजेपर्यंत मित्रांसोबत वर्गणी गोळा केली. यानंतर अर्ध्या तासात त्याने आत्महत्या केल्याचे समजताच सर्वत्र खळबळ उडाली. मुकेश डिके यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद बोदवड पोलिसात करण्यात आली तपास दिनकर धायडे करीत आहेत. दरम्यान, लग्न लवकर जुळत नसल्याच्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.