बोदवड- शहरातील रवींद्र दत्तात्रय बोरनारे (56) या बेपत्ता इसमाचा मृतदेह बोदवड परीसरातील शिवद्वाराजवळील खुनी विहिरीत आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून बोरनारे बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध सुरू होता या प्रकरणी गणेश शंकर बोरनारे (48) यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हातमजुरी तसेच न्हावी काम करून उदरनिर्वाह करणर्या बोरनारे यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. बोदवड ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, बोरनारे यांनी आत्महत्या केली की अन्य कारणाने त्यांचा मृत्यू झाला ? याबाबत माहिती कळू शकली नाही. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. तपास कॉन्स्टेबल सुरेश माळी करीत आहेत.