बोदवड- शहरातील कुरेशी मोहल्ल्यातील विवाहितेचा पतीनेच दोरीने गळफास देऊन खून केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली होती. आरोपी पतीला अटक केल्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शमानाबी शेख अश्रफ (32) या विवाहितेचा पती तथा संशयीत आरोपी शेख अश्रफ शेख चांद कुरेशीने दोरीने गळा आवळून खून केला होता. या प्रकरणी विवाहितेचा पिता इलियास खान चौधरी (मालेगाव) यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.