जळगाव। बोदवड येथील उजनी दर्ग्यांवर नवस फेडण्यासाठी जात असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील भाविकांच्या वाहनाला डंपरने कट मारल्याने अपघात होवून 25 पेक्षा अधिक जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली असून काही जखमींना बोदवड शासकिय रुग्णालयात तर काहींना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भाविकांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला व हाताला जबर मार बसला आहे.
नवस फेडण्यासाठी जात होते दर्ग्यावर
पिकचप व्हॅन उलटल्यानंतर नंदनी नितीन कवरे, ओम नितीन कवरे, कस्तुराबाई पुनमचंद, गुलाब ओंकार कवरे, बाळू, बेबाबाई गुलाबराव वाधे, ममता गुलाबराव वाधे, दुर्गा जितेद्र कवरे, राजकन्या संतोष पाखरे, सुभाष धोंडू कटोणे, सुमन देविदास युंबेत, नंदिनी नितीन कवरे, भाविश पुनमचंद राठोड, विष्णु फुलचंद राठोड, संदिप रामचंद्र राठोड, दिपाली रामचंद्र राठोड, विठ्ठल रामचंद्र राठोड, प्रकाश राठोड, सुनिता सोपान पाखरे, दीपक सोपान पाखरे, रामभाऊ पाखरे, पदमाबाई उत्तम पाखरे, जिजाबाई बाबुराव धरे, नितीन धिरज धरे, कविता पाखरे, गजानन चौके हे जखमी झाले आहेत.
जखमींवर बोदवड येथिल शासकिय रुग्णालयात प्रथमोपचार करुन रवाना करण्यात आले. तर गंभीर जखमी असलेल्या नंदीनी नितीन कवरे (वय-20), नितीन साहेबराव कवरे (वय-21), ओम नितीन कवरे (वय-3), गुलाब ओंकार कवरे (वय-35), राजकन्या संतोष पाखरेअ (वय-20), सुभाष धोंडू कटोणे (वय-47), दुर्गा जितेंद्र कवरे (वय-26), सुनिता सोपान पाखरे (वय-25) सर्व रा. टाकळी यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच यानंतर सायांकाळी काही रूग्णालयांना खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, यात महिलांना मोठया प्रमाणात दुखापत झाली आहे.