बोदवडमधील डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

0

बोदवड : स्वत: कोरोनाबाधीत असतांनाही नियमांचे उल्लंघण करून रुग्णांची तपासणी केल्याने नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक प्रकार शहरात उघड झाला असून या डॉक्टरांविरुद्ध बोदवड तहसीलदारांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉक्टरांविरुद्ध अखेर गुन्हा
बोदवड तहसीलदार हेमंत पाटील यांच्या फिर्यादीनुसार, डॉ.धीरज शंकरलाल दुधानी (41, रा.शालिमार टॉकीज मागे, नाडगाव रोड, बोदवड) यांनी 25 जून रोजी बोदवड येथील कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी स्वॅब दिला होता व स्वॅब दिल्यानंतर नियमानुसार त्यांना रीपोर्ट येईपर्यंत क्वॉरंटाईन होणे गरजेचे होते. तथापि त्यांनी दिनांक 27 जून रोजी नाडगाव तर 28 रोजी शेलवड येथे रुग्णांची तपासणी केली. दरम्यान, 28 जून रोजीच डॉ. दोधानी यांचा रीपोर्ट कोरोना पॉझीटीव्ह आला. यानंतर त्यांनी तपासणी केलेल्या रूग्णांनाही कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी करण्यात आली. यात नाडगाव आणि शेलवड या दोन्ही गावांमधील एकूण नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. डॉ.धीरज दुधानी यांनी स्वॅब दिल्यानंतर होम क्वॉरंटाईन होण्याच्या नियमाचे उल्लंघण करून रुग्णांची तपासणी केली व यामुळे त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले. यामुळे बोदवड येथील तहसीलदार हेमंत भागवत पाटील यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा 1897 आणि महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.