बोदवड : शहरातील नगरसेविका सुशीलाबाई गंगतिरे यांची चार वर्षीय नातीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना 4 रोजी घडली. श्रावणी दिलीप गंगतिरे (4) असे मृत बालिकेचा नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून या बालिकेवर उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असतानाच तिचा शनिवारी मृत्यू झाला. 1 जानेवारी रोजी या बालिकेचा वाढदिवस झाला होता. मयत श्रावणीच्या पश्चात आई, वडील, आजी असा परीवार आहे.