बोदवड : कोरोना संसर्ग लॉकडॉउन बाबत आढावा बैठक व नगरपंचायतीमध्ये घंटागाडी लोकार्पणासाठी आमदार चंद्रकांत पाटील हे बोदवड येथे आल्यानंतर त्यांनी सेंट्रल बँकेसमोर आबालवृद्धांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहून त्यांनी तातडीने आबालवृद्धांच्या सोयीसाठी मंडप उभारण्याचे आदेश दिले व काही वेळातच सेंट्रल बँक व स्टेट बँकेबाहेर तत्काळ मंडळ उभे करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, सेंट्रल बँक मॅनेजर आनंद, स्टेट बँक मॅनेजर अरुण कुमार, शिवसेना अल्प संख्यांक जिल्हा उप प्रमुख कलीम शेख, नगरसेवक सुनील बोरसे, राजू साठे, गणेश गंगतीरे, शिवाजी ढोले, सदानंद वाघ उपस्थित होते.