बोदवड : शहरातील शिवद्वाराजवळ असलेले किराणा दुकान फोडून काजू-बदामासह 15 हजारांच्या रोकडवर डल्ला मारला. या घटनेने शहरातील व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. 14 रोजी रात्री सात ते 15 रोजी सकाळी नऊ वाजेपूर्वी ही चोरी झाली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. किराणा दुकानदार देविदास धनकुदास चांडक (73, बोदवड) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी एक हजार पाचशे रुपये किमतीचे एक किलो काजू व एक किलो बदाम तसेच 15 हजारांची रोकड लांबवला. तपास हवालदार कालिचरण बिर्हाडे करीत आहेत.