बोदवड : डॉ.आंबेडकर चौकाजवळील चहाच्या दुकानातून चहा पत्तीसह काही रोख रक्कम लांबवल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी टी स्टॉल चालक आशिष सुरेश बडगुजर (34) यांच्या फिर्यादीनुसार 23 जुलैच्या रात्री सात ते 25 जुलैच्या सकाळी आठ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी सहाशे रुपये किंमतीचे तांब्याच्या पाण्याची बाटली व 800 रुपये किंमतीचा आयटेल कंपनीचा मोबाईल, सहा हजार रुपये किंमतीची लंडन कंपनीची 20 किलो चहा पत्ती व 490 रुपये किंमतीची पाच किलो साखर व पाच लिटर दुध असा एकूण सात हजार 890 रुपये किंमतीच्या वस्तू लांबवल्या. बोदवड पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार कालिचरण बिर्हाडे करीत आहेत.