बोदवडमध्ये चोरट्यांचा उच्छाद : धान्य दुकान फोडले

0

बोदवड : जुन्या तहसील कार्यालयाजवळ असलेल्या धान्याच्या दुकानातून चोरट्यांनी धान्यासह काही रोख रक्कम लांबवण्याची घटना सोमवारी उघडकीस आली. बोदवड पोलिसात या प्रकरणी विजय सुरेंद्र कुमार जैन (42) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 7 जूनच्या दुपारी तीन वाजेपासून तर 8 जूनच्या रात्री दोन वाजेपर्यंत चोरट्ययांनी धान्य दुकानातून सात हजार दोनशे रुपये किंमतीचे 50 किलो वजनाचे सहा गव्हाचे कट्टे व अडीच हजारांची रक्कम लांबवली. तपास हवालदार विलास महाजन करीत आहेत.