बोदवडमध्ये चोरट्यांनी लांबवली दुचाकी : स्केचद्वारे चोरट्याचा शोध

0

बोदवड- शेताच्या बांधावर लावलेली शेतकर्‍याची दुचाकी लांबवल्याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल असून स्केचद्वारे बोदवड पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. किशोर अवघडराव पाटील (नाडगाव) यांचे हिंगणे-नाडगाव रस्त्यावर शेत असून तेथे त्यांनी त्यांच दुचाकी (एम.एच.19 यु.7458) लावली असता चोरट्यांनी 9 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास लांबवली. दुचाकी चोरट्यांना तक्रारदाराने अडवण्याचा प्रयत्न केला मात्र ते पसार झाले मात्र तक्रारदाराच्या वर्णनावरून चोरट्याचे स्केच बनवण्यात आले असून असा संशयीत आढळल्यास बोदवड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.