बोदवडमध्ये जिनिंगला आग ; 12 लाखांचे नुकसान

0

बोदवड- शहरातील जामनेर रोडवरील माँ वैष्णोदेवी जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंगला सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आग लागल्याने सुमारे 12 लाखांचे नुकसान झाले. जिनिंगमध्ये काम सुरू असताना गारगोटीची ठिणगी उडाल्याने आग लागली. पाहता-पाहता आगीने भडका घेतल्याने अंदाजे 200 क्विंटल तसेच गठाणीच्या खोळी अंदाजे 10 हजार नग व दोन हजार नग पॅकेजिंग पट्टी, प्रेस बेल्ट जळाल्याने एकूण 12 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी बोदवड पोलिसात युवराजसिंग लक्ष्मणसिंग परदेशी (58 जय माता दी नगर, रा.बोदवड) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप चौधरी करीत आहेत.