सहा जणांना अटक : 65 हजाराचा मुद्देमाल जप्त
बोदवड- पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीष भामरे ,पोलीस हवालदार अनिल चौधरी , अक्षय हिरोळे, विजय कचरे , गोपाळ गव्हाळे ,सागर वंजारी यांनी जामठी रोडवरील जय ढाब्याजवळील शेतात पोलीसांनी अचानक धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. या धाडसत्रात पोलीसांनी मोटार सायकल, मोबाईल, रोख रूपये व जुगाराचे साहीत्य असा 65 हजार 350 रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.तर कैलास वाघ , अमिनखाँ पठाण, दिपक सपकाळ ,सलीम बेग ,योगेश भोंबे ,शेख जाकीर अशा सहा जणांवर सागर वंजारी यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार दिनकर धायडे करीत आहेत.